Showing posts with label मराठी ग़ज़ल. Show all posts
Showing posts with label मराठी ग़ज़ल. Show all posts

Tuesday, October 29, 2024

कसे प्रेमात मन(मराठी ग़ज़ल)

कसे प्रेमात मन वाहून गेले |
तुझ्या हृदयात ते राहून गेले ||
मला सोडून तू जाणार कोठे |
जगच सगळे तुला पाहून गेले ||
कळल जस आज तू येणार दारी |
कितींदा दार मी पाहून गेले ||
प्रितीचे बोल ते ऐकायचे  बस |
मला तर वेड हे लागून गेले ||
कशाला हाथ सुटले गुंफलेले |
मनाचे "रूह" सुख हरवून गेले ||