Thursday, August 13, 2026

कोड माझा मनाचे

कोड माझा मनाचे गुपित राहिले।
आत काहीतरी बस जळित राहिले।।

बोललो मी न काही तुला शेवटी।
शब्द ओठांत माझे खचित राहिले।।

दूर गेली तरी साथ सुटले कुठे?
प्रेम माझे अमित हे अमित राहिले।।

सावलीचा न धागा मिळाला मला।
वाळवंटात मन हे थकित राहिले।।

​​रूह जाळून मी दीप केला इथे।
गीत माझे सदा उज्वलित राहिले।।

No comments: